Manasvi Choudhary
सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्नकार्यात चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी महिला अनेक उपाय करतात.
बऱ्याच महिला पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त फेशियल, फेसपॅक, फ्रेसक्रिम लावतात.
मात्र यामुळे चेहरा आणखी खराब होतो. केमिकल प्रोडक्ट्स वापरल्याने कालातरांने चेहऱ्यावर डाग, पुरळ येतात.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही नियमितपणे त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे.
तोडं धुतल्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावल्याने ग्लो येईल. चेहरा चमकू लागेल.
तुम्ही घरच्या घरी गुलाबपाणी चेहऱ्याला लावू शकता. गुलाब पाणी टोनर म्हणून चांगले काम करते.
चेहरा उजळण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा वापर करू शकता. तोंड धुतल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.