Manasvi Choudhary
मधुमेह हा गंभीर आजार आहे. मधुमेह हा केवळ पुरूषांनाच नाही तर महिलांना देखील होतो.
महिलांना मधुमेह होण्याची सुरूवातीची लक्षणे काय आहेत? ती कशी ओळखायची? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
मधुमेह झाल्यास तुम्ही वेळीच लक्षणे ओळखल्यास तुम्हाला मोठा धोका टाळण्यास मदत होईल.
शरीरात इन्सुलिन यामुळे रक्तातील साखर शोषून घेऊन ऊर्जा निर्माण करण्यासाठी पेशींपर्यत पोहोचवते. स्वादुपिंड शरीरात इन्सुलिन सोडते.
मात्र जर शरीरात इन्सुलिनचे कार्य करणे थांबले तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि टाईप 1, टाईप 2 मधुमेह होतो.
अनेक महिला मधुमेहाच्या लक्षणांना सामान्य समजून दुर्लक्ष करतात मात्र यामुळे या आजाराचे निदन वेळेत होत नाही.
महिलांमध्ये मधुमेह असल्यास मूत्रपिंडाचे आजार, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, स्तनाचा कर्करोग, त्वचेच्या समस्या उद्भवतात.
मधुमेह झाल्यास व्यक्तीला सतत भूक लागते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास किंवा कमी झाल्यास भूकेवर परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.