Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics: भाजप आमदाराने शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली, VIDEO पोस्ट करत ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

Ambadas Danve On Rana Jagjitsinh Patil: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिवच्या दौऱ्यावर असताना भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली. याचा व्हिडीओ अंबादास दानवे यांनी पोस्ट केला.

Priya More

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी दौरा करत आहे. धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप ठाकरेसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला 'काजू-बदाम छाप सरकार' असा टोलाही लगावला. गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

ठाकरेसेनेचे नेते आंबदास दानवेंनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना देखील जोरदार टोला लगावला. दोन चार ट्रान्स्फॉर्मरच्या बदल्यात 3 लाख 29 हजारांचे मताधिक्य सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले की असाच तुसडेपणा नशिबाला येतो, असे म्हणत दानवेंनी व्हिडिओ ट्विट केला. ठाकरेंनी केलेले जिवापाड प्रेम पचले नाही तुम्हाला असा निशाणा देखील त्यांनी ओमराजेंवर साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Namo Shetkari Yojana : दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० येणार! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT