Ajit Pawar Slams CM Eknath Shinde  Saam TV
Video

Maharashtra Politics : आम्हाला अजित पवारांची गरज, त्यांच्यावर टीका करणं टाळा; भाजप नेत्यांची आरएसएसला विनंती

Maharashtra Political News : अजित पवारांवर टीका करणे टाळा, असं भाजप नेत्यांनी आरएसएसला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Satish Daud

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात मांडण्यात आलं होतं. यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता आगामी विधानसभेची निवडणूक अजित पवार स्वबळावर लढणार का? अशाही चर्चा सुरू झाला.

मात्र, भाजप नेत्यांनी अजित पवार महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक विनंती देखील केली आहे. अजित पवारांवर टीका करणे टाळा, असं भाजप नेत्यांनी आरएसएसला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे टाळा. अन्यथा महायुतीत फूट पडू शकते, अशी विनवणी देखील भाजप नेत्यांनी आरएसएसला केल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT