Supreme Court of India delivers key verdict on OBC reservation and ward structure for Maharashtra’s local elections. Saam Tv
Video

मोठी बातमी! महापालिका, नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहच होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय|VIDEO

Supreme Court Verdict On OBC Reservation: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका २७% ओबीसी आरक्षणासह आणि नवीन वॉर्ड रचनेनुसार घेण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ganesh Kavade

मुंबई : राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आता नवीन वॉर्ड/प्रभाग रचनेनुसार आणि 27% ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आज महत्त्वाचा निर्णय दिला असून, दोन याचिका फेटाळत हा मार्ग मोकळा केला आहे.

औसा नगरपालिकेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा ठोस निर्णय

लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक 11 मार्च 2022 पूर्वीच्या वॉर्ड रचनेनुसार घ्यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत स्पष्ट केलं की, निवडणूक नवीन वॉर्ड रचनेनुसारच घेतली जाणार आहे.

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

दुसऱ्या याचिकेत ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने आपल्या 6 मे 2025 च्या आदेशाचा पुनरुच्चार करत सांगितलं की, 27% आरक्षणासहच निवडणुका घेतल्या जातील.

वॉर्ड/प्रभाग रचना राज्य सरकारचा अधिकार

सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्टपणे नमूद केलं की, वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा विषय पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिकारात येतो. यासंदर्भात राज्य विधिमंडळाने कायदा केला असून, त्या कायद्याला कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे न्यायालयाचा हस्तक्षेप शक्य नाही.

या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk & Yogurt : दूध की दही; लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय ?

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

SCROLL FOR NEXT