Shreya Maskar
'बिग बॉस १९'चा विजेता अभिनेता गौरव खन्ना ठरला. तर 'बिग बॉस १९'चा दुसरा रन-रप प्रणित मोरे झाला.
प्रणित मोरे एक स्टँडअप कॉमेडीयन आहे. त्याचा हा पहिलाच रिअॅलिटी शो होता. त्यामुळे मर्यादित सोशल मीडिया सपोर्ट आणि फॅन फॉलोइंगचा अभाव होता.
प्रणित मोरे प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यास कुठे तरी कमी पडला. तसेच गेम जास्त प्रभावी नसल्यामुळे मतदानावर फरक पडला.
'बिग बॉस १९'च्या घरात काही ठिकाणी टास्क दरम्यान आक्रमक स्वभाव दिसला. गरजेपेक्षा जास्त राग दाखवला. ज्यामुळे नकारात्मक प्रतिक्रिया वाढल्या. टास्क दरम्यान थोड आक्रमक स्वभाव, एकमेकांना पाठिंबा देण्याती वृत्ती थोडी कमी पडली. खेळापेक्षा व्यक्तीगत अहंकार दिसला.
टास्क दरम्यान प्रभावीपणे गेम प्लान दिसला नाही. नियोजनाची कमतरता जाणवली. कुठे तरी स्पष्टवक्तेपणा कमी पडला.
टीमसाठी खेळताना कमी दिसला. नेतृत्वाची संधी असूनही ती प्रभावीपणे पार पाडता आली नाही. काहीवेळा पॉझिटिव्हपेक्षा नकारात्मक बोले गेले.
प्रणित मोरेला स्पर्धा करणाऱ्या गौरव खन्नाचा चाहता वर्ग जास्त आहे. तसेच त्याने या इंडस्ट्रीत जास्त अनुभव कमवला आहे. तसेच अनेक रिअॅलिटी शोचा भाग बनला आहे. प्रणित मोरेसाठी हा पहिला आणि नवा अनुभव होता.
'बिग बॉस १९' ची ट्रॉफी न जिंकताही प्रणित मोरेने महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे. चाहते त्याला खूप पसंत करतात. प्रणितने आपल्या कॉमेडीने अनेकांना खळखळवून हसवले आहे.