RPI candidate Prakash Londhe, currently lodged in jail, takes an early lead during counting in Nashik Municipal Corporation elections. Saam Tv
Video

केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय विजयाच्या उंबरठ्यावर, कुख्यात गुंड असलेल्या उमेदवारानं जेलमधून लढवली निवडणूक|VIDEO

RPI Candidate Prakash Londhe Election News: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून जेलमधून निवडणूक लढवणारे आरपीआय उमेदवार प्रकाश लोंढे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. कुख्यात गुंड आणि मकोका आरोपी असलेल्या उमेदवाराच्या यशाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून एक वेगळाच निकाल समोर येत आहे. कारागृहातूनच निवडणूक लढवणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय चे उमेदवार प्रकाश लोंढे हे पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत प्रकाश लोंढे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आघाडी घेतली आहे. कारागृहात असतानाही त्यांनी निवडणूक लढवल्याने या प्रभागातील लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.

मतमोजणीच्या पुढील फेर्‍यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम निकाल काय लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील हा निकाल नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ठरू शकतो. गोळीबार, खंडणी, खून अशा अनेक गुन्ह्याची पार्श्वभूमी या कुख्यात गुंडावर आहे. मकोका देखील प्रकाश लोंढेवर लावण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : सांगलीत भाजपनं केला करेक्ट कार्यक्रम; ४ प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी

Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या मुलाचा दारुण पराभव, EVM वर घेतला आक्षेप |VIDEO

Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

SCROLL FOR NEXT