Bogus speed control meters installed in vehicles, exposing a multi-crore scam in Maharashtra. Saam Tv
Video

राज्यात स्पीड कंट्रोल मीटर घोटाळा; चालकांची मोठी फसवणूक|VIDEO

Fake Speed Control Meters: महाराष्ट्रात स्पीड कंट्रोल मीटर घोटाळा उघडकीस आला आहे. चालकांची फसवणूक, बनावट पावत्या आणि प्रवासी सुरक्षेचा गंभीर धोका समोर आला असून शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

Omkar Sonawane

राज्यात आणखी एक शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. भरधाव वेगामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहनांमध्ये स्पीड कंट्रोल मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, ही मीटर केवळ नावालाच इलेक्ट्रॉनिक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ही स्पीड कंट्रोल मीटर गाड्यांचा वेग कमी करण्याऐवजी फक्त दाखवण्यासाठी बसविण्यात आल्याचा आरोप चालकांनी केला आहे. प्रत्यक्षात या उपकरणामुळे वेगावर कोणतंही नियंत्रण येत नाही.

याहूनही गंभीर बाब म्हणजे या बोगस मीटरसाठी चौपट शुल्क आकारलं जात असून चालकांना दिली जाणारी पावती देखील बनावट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गाड्यांसह प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असून या संपूर्ण प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. टॅक्सी चालक संघटनांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: 'या' ४ राशींसाठी बुधवार दिवस सोन्यासारखा; वाचा खास राशीभविष्य

Sara Ali Khan: सारा अली खानचा झक्कास लूक, नजरेने सौंदर्याला लावले चारचाँद

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

Marathi Producer Death: साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि निर्माते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

SCROLL FOR NEXT