CM Devendra Fadnavis  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले. लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

Priya More

लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्याचा विचार सुरू असल्याचं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मिटकरी यांनी या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर धाराशिव येथील सभेमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठं विधान केले. लाडक्या बहिणींना योग्य वेळी २१०० रुपये देऊ असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेकांनी विरोध केला. पण लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. योग्य वेळी जे बोललो ते करणार लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा देखील निर्णय घेणार आहोत. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT