Ashish Shelar Saam TV
Video

Ganeshotsav Festival : गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची घोषणा | VIDEO

Ashish Shelar Announcement: महाराष्ट्र सरकारच्या विधानसभेच्या अधिवेशनात सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोठी घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या चालू अधिवेशनात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत सांगितले की, ‘गणेशोत्सव’ला आता महाराष्ट्राचा अधिकृत राज्योत्सव म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे.या घोषणेमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला अधिकृत मान्यता मिळणार असून, राज्य शासनाकडून अधिक आर्थिक व प्रशासकीय पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच आज चालू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव आहे.गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जातो. राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत असून, गणेशोत्सव मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Healthy Drink: नवरात्रीच्या उपवासात शरीराला ऊर्जा देणारे 'हे' आहेत हेल्दी ड्रिंक्स

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Dussehra 2025 : लव्ह लाइफ, करिअर, पैशांची तंगी; सर्व समस्या होतील दूर, फक्त दसऱ्याला करा 'हे' उपाय

Railway Diwali Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, बोनस कधी मिळणार? मोठी अपडेट

Nandurbar Tribal Agitation: आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

SCROLL FOR NEXT