Deputy CM Devendra Fadnavis addressing media after the cabinet meeting, announcing ₹19,000 crore relief package for Maharashtra farmers. Saam Tv
Video

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? VIDEO

Devendra Fadnavis Announces 15-Day Timeline: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, अजून ११ हजार कोटी रुपये पुढील १५ दिवसांत पोहोचवले जातील.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आतापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या अंतर्गत 8 हजार कोटी रुपये रिलीज केले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11 हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली. हे बजेटमधील पैसे नसल्याने याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचवण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, आता दिला गेलेला निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला आहे. काही ठिकाणी तो अशतः गेला आहे. याचे कारण म्हणजे आम्ही निर्णय घेतला घेतला होता, की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सर्व यद्यांसाठी थांबायचे नाही. त्यामुळे कोणी शंका बाळगण्याची गरज नाही की आम्हाला तर एनडीआरएफचे पैसे मिळाले पण 10 हजार मिळाले नाहीत. 10 हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत. ज्याना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही टाकतोय.

पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील. 90 टक्क्यांपर्यंत शेतकरी आम्ही या 15 ते 20 दिवसांत कव्हर करू निधीची कमतरता उरलेली नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT