Family dominance in Maharashtra politics highlighted as leaders’ relatives win local body seats unopposed. Saam Tv
Video

राजकारणात घराणेशाहीचा डंका, कार्यकर्त्यांनी फक्त सतरांज्या उचलायच्या का? VIDEO

Impact Of Political Nepotism: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत पुन्हा एकदा घराणेशाहीचा डंका वाजला आहे. प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांची बिनविरोध निवड होत असताना कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे, जिथे प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड झाली. दुसरीकडे, अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यादेखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.

याचबरोबर, कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सून, सेहर निदा मुश्रीफ, यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या घटनांमुळे राज्याच्या राजकारणात वारसा हक्काच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाच रान करून, दिवस रात्र आपल्या नेत्यासाठी प्रचार केला. ह्याच अपेक्षेने की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळेल. मात्र तसे न होता आमदारांनी, मंत्र्यांनी स्वतःच्याच घरातील उमेदवार देऊन पुन्हा एकदा राजकारणात फक्त घराणेशाहीच चालते हे सिद्ध केले का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

बिनविरोधनंतर आता बिनशर्त, अधिकृत उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंना जोरदार धक्का

Ladki Bahin Yojana: या जिल्ह्यातील २ लाख लाडक्या बहिणी नाराज; eKYC केलं पण खात्यात ₹१५०० आलेच नाहीत

Top Morning Yogasans: जीमची गरज नाही , घरीच फक्त १० मिनिटे करा ही 5 योगासने, बॉडी होईल रिलॅक्स

Raj Thackeray: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं त्यांचं स्वप्न, पण...; राज ठाकरेंचा निशाणा कुणाकडं?

SCROLL FOR NEXT