Eknath shinde News Saam Tv
Video

Maharashtra Politics : शिंदे गटात मंत्रिपदाची संगीत खुर्ची? नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी टाकला नवा डाव? VIDEO

eknath shinde News : महायुतीचे तिन्ही पक्षाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत... त्यातच शिंदे गटाने फिरत्या मंत्रिपदाची रणनीती आखलीय, मात्र हे फिरतं मंत्रिपद नेमकं कसं असणार? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Vishal Gangurde

भरत मोहळकर, साम टीव्ही

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं.. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.. त्यातच महायुतीत मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच वर्षांसाठी फिरतं मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...मात्र हा फॉर्म्युला नेमका कसा असणार ते पाहूया...

फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला?

मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतल्यापासून अडीच वर्षे मंत्रिपदावर राहता येणार

अडीच वर्षानंतर सहकारी आमदारांसाठी मंत्रिपद सोडावं लागणार

जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यासाठी फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला

बंडावेळी महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना प्राधान्यानं मंत्रिपद मिळण्याची शक्यता

महायुती सरकारमध्ये शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपने अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत या वादग्रस्त मंत्र्यांना वगळण्याची मागणी केलीय.. मात्र हे पहिल्या फळीतील नेते असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांची अडचण झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यातच आता इच्छुकांची भाऊगर्दी असताना शिंदेंनी फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला असला तरी इच्छुकांना हा फॉर्म्युला पचनी पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT