Devendra Fadnavis Saam Tv
Video

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Maharashtra Record Investments : दावोस दौऱ्यात महाराष्ट्राला जवळपास ₹३० लाख कोटींची गुंतवणूक मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरनिहाय आणि क्षेत्रनिहाय गुंतवणुकीची माहिती दिली.

Bharat Jadhav

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत महाराष्ट्र आणि देशात चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केले. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात किती कोटींची गुंतवणूक आली याची मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. महाराष्ट्राने जवळपास 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. या गुंतवणुकीत इंडस्ट्री सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, शेती, टेक्नोलॉजी अशा सगळ्याच क्षेत्रात गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांसाठी गुंतवणूक आली आहे.

कोकण क्षेत्रात 16 टक्के, एमएमआर क्षेत्राला 22 टक्के, विदर्भात 13 टक्के ही गुंतवणूक आलीय. 50 टक्के गुंतवणूक महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे या सगळ्या भागांमध्ये गुंतवणूक आली आहे. येथे जवळपास 50 हजार कोटींची गुंतवणूक तिथे आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तयार झालं आहे. तिथे 55 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. नागपूर विभाग आणि विदर्भात 2 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. यासह कोकणात 3 लाख 50 हजार कोटींची गुंतवणूक आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीची कारवाई; लाचखोर अधिकारी जाळ्यात सापडला

ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची वादळी खेळी; टीम इंडियाने नामिबियाला धूळ चारली, सुपर-8 मध्ये मिळवलं स्थान

चंद्रपूरवरुन ठाकरे बंधूंमध्ये ठिणगी? ठाकरेंचा भाजपला पाठिंबा, मनसेचा टोला

अकोल्यात भयंकर घडलं; आगीत होरपळून मामा-भाचीचा मृत्यू, हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

दादांच्या विमान अपघातावरून खळबळजनक दावा, विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता?

SCROLL FOR NEXT