Raigad Saam TV
Video

Raigad : महाडच्या नाणेमाची धबधब्यावर तरूणाची जीवघेणी स्टंटबाजी, पाहा थरारक VIDEO

Dangerous Stunts at Naneghat Waterfall : रायगड जिल्ह्यातील महाडमधील प्रसिध्द नाणेमाची धबधब्यावर पर्यटकांनी जीवघेणे स्टंट केल्याचे व्हिडीओ समोर आला आहे. दोन डोंगरांवर दोरखंड बांधून गिर्यारोहकांनी धबधब्याच्या पाण्यावर स्टंट केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यातील महाडमधील प्रसिद्ध नाणेमाची धबधब्यावर काही पर्यटकांनी जीवाशी खेळ करणारे स्टंट करत परिसरात खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.या व्हिडीओमध्ये दोन डोंगरांदरम्यान दोरखंड बांधून गिर्यारोहकांनी धबधब्याच्या पाण्यावरून स्टंट करतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसून येत आहे. ही संपूर्ण कृती अत्यंत धोकादायक असून, थोडासा चुकीचा अंदाज देखील जीवघेणा ठरू शकतो.

या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटनस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही योग्य व्यवस्था नसताना अशा स्टंटसाठी परवानगी न घेता धाडस करणं म्हणजे निष्काळजीपणाचं उत्तम उदाहरण असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.या प्रकारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींनी केले जगातील सर्वात उंच श्री राम पुतळ्याचे अनावरण, जाणून घ्या या ७७ फूट उंचीच्या पुतळ्याची खास वैशिष्ट्ये

India GDP: भारताची अर्थव्यवस्था बुलेट स्पीडनं सुस्साट; GDPनं गाठला मोठा टप्पा, 'या' क्षेत्रात जबरदस्त कामगिरी

Maharashtra Live News Update: मतदान व मतमोजणी परिसरात १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्र – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Crime News : २४ वर्षांच्या तरुणीनं जाळं टाकलं, मुंबईचा बिल्डर अडकला; लॉजवर बोलावलं, आरेच्या जंगलात नेऊन...

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT