Mahadev Jankar interacting with farmers on the farm bund during his Akola visit Saam Tv
Video

शिक्षण आणि जोडधंद्यावर भर द्या; महादेव जानकरांचा शेतकऱ्यांना सल्ला|VIDEO

Pasha Patel Controversial Statement Reaction: महादेव जानकर यांनी अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाशा पटेल यांच्या विधानावर टीका करत त्यांनी शेतकऱ्यांना मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे व शेतीसोबत जोडधंदा करावा असा सल्ला दिला.

Omkar Sonawane

महादेव जानकर यांनी अतिवृष्टीग्रस्त अकोला जिल्ह्याला भेट दिली.

पाशा पटेल यांच्या वक्तव्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांना शिक्षण व जोडधंद्याचा सल्ला दिला.

बांधावरूनच पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

भाजपा नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय. पाशा पटेल यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं जानकर म्हटलंये. ते अकोला जिल्ह्यातील सांगवामेळ येथे माध्यमांशी बोलत होतेय. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या मूर्तीजापुर तालुक्यातील विविध गावांना आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर भेट दिलीय. सध्याच्या वाईट परिस्थितीत पाशा पटेलांसारखे नेते अशी विधानं कशी करतात?, असा सवाल यावेळी महादेव जानकर यांनी विचारलाय. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवामेळ, भटोरी, पारध, कौलखेड जहांगीर या गावांना त्यांनी भेटी दिल्यात. तर थेट शेतीच्या बांधावरून पालकमंत्री आणि जिल्हाधिकऱ्यांशी फोनवर सवांद साधलाये. तसेच आपल्या मुलांना शिकवा एमपीएससी सारख्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि शेतीसोबत जोडधंदाही करावा असा सल्ला देखील महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT