Kolhapur Black Magic Saam Tv
Video

Kolhapur: टाचण्या मारलेले लिंबू, हळद-कुंकू, नारळ अन् अंडी..., राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात भानामतीचा प्रकार; पाहा VIDEO

Kolhapur Black Magic: कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या घरामसमोर भानामतीचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली. टाचण्या मारलेले लिंबू, हळद-कुंकू, नारळ अन् अंडी घरासमोर ठेवण्यात आली.

Priya More

कोल्हापुरातील मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ३ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे निवासस्थान मुख्य बाजार पेठेत आहे. दोन दिवसांपूर्वी मोर्चे आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी अमृता मोर्चे यांच्या दारातच मोठी सभा घेतली होती. याच ठिकाणी पहाटे भानामती, करणीचा प्रकार घडला आहे. मोर्चे यांच्या घराच्या दारात दोन्ही बाजूला हा प्रकार आढळून आला आहे. पत्रावळीमध्ये नारळ, पाच ते सहा लिंबू ठेवून त्याच्यावर वेगवेगळे अंगारे, हळद कुंकू, फुले टाकलेली होती. शिवाय लिंबुना टाचण्या मारल्या होत्या. यानंतर विकास मोर्चे यांनी या गोष्टीचा निषेध करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT