A forest department team searches for the leopard inside the Bhonsala Military School premises in Nashik after panic triggered among students and parents. Saam Tv
Video

धक्कादायक! नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरला; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा व्हिडिओ

Leopard Enters Military School In Nashik: नाशिकच्या गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या शिरल्याने शाळेत भीतीचे सावट पसरले. सुरक्षा कारणास्तव शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पालकांना विद्यार्थ्यांना तत्काळ घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

नाशिकच्या गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला सुट्टी जाहीर केली असून, पालकांना आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील शहरातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दोन दिवसपूर्वीच महात्मा नगर भागात बिबट्या शिरला होता. या बिबट्याने अनेक नागरिकांना जखमी देखील केले होते. मोठ्या शिताफीने या बिबट्याला जेरबंद केले. अशातच आज दोन दिवसातच जवळच असलेल्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या दिसून आल्याने लहान मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT