Stone pelting on Laxman Hake’s car during clash with MLA Vijay Singh Pandit’s supporters in Georai, Beed Saam Tv
Video

लक्ष्मण हाके यांच्या कारवर दगडफेक; बीडमध्ये हाके-पंडित कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा |VIDEO

Georai clash between Laxman Hake and Vijay Singh Pandit: बीडच्या गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थक आमनेसामने आले. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

Omkar Sonawane

गेवराईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके व पंडित गट आमनेसामने आले.

पंडित समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक केली.

पोलिसांनी तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

वादग्रस्त विधान आणि पुतळा दहनातून संघर्षाला सुरुवात झाली.

बीडमधील ओबीसी समाजाच्या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक होऊन गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. दरम्यान, माझे पुतळे काय जाळतो.. मलाच जाळ असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिले. त्यानंतर आज हाके हे गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि मोठा राडा झाला. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक केली आणि मोठा तणाव निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

SCROLL FOR NEXT