latur news  saam tv
Video

Weather Update: पाऊस आला धावून लातूरचा पूल गेला वाहून|VIDEO

Rena river flood: लातूर जिल्ह्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे ग्रामीण भागातील एक पूल वाहून गेला आहे.

Omkar Sonawane

लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारी देखील दुपारी शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान रेणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे रेणा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. यातून नद्या नाल्यांना पाणीच पाणी आले आहे. या मुसळधार पावसामुळे रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

लातूर जिल्ह्यात सलग 10दिवसापासून मुसळधार अवकाळी पाऊस कोसळतो आहे... पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तर तिकडे घरणी नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्याने, नदीवरील पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळं सकाळ पासून शिरूर अनंतपाळ वरून उदगीरकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे तर तालुक्यातील नदीपलीकडील वीस गावांचा संपर्क तुटल्याचे देखील माहिती समोर येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रामटेकच्या मंदिरातील ‘नंदी’ सांगतो पाप-पुण्याचा हिशोब? जाणून घ्या कसा होते हा न्याय

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

KDMC Election : एकनाथ शिंदेंचा मित्रपक्ष भाजपलाच जोरदार धक्का; डोंबिवलीत मोठी उलथापालथ

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, पुण्यातील मराठा सेवकांची मागणी

SCROLL FOR NEXT