Chaitanya E-Techno School in Latur allegedly reopened after breaking the seal placed by the Education Department. Saam Tv
Video

लातूरमध्ये बोगस चैतन्य ई-टेक्नो स्कूलचा अजब कारभार; शिक्षण विभागाची टाळ मोडून शाळा सुरूच|VIDEO

Chaitanya E-Techno School In Latur: लातूरमधील चैतन्य ई-टेक्नो स्कूल परवानगीशिवाय सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाने टाळ ठोकली. मात्र शाळेने ती मोडून पुन्हा बिनधास्तपणे सुरू केल्याने वाद निर्माण झाला असून मनसेने शाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

लातूर शहरातील चैतन्य ई-टेक्नो स्कूल या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा धक्कादायक गैरकारभार उघडकीस आला आहे. योग्य परवानगीशिवाय शाळा सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागाने शाळेवर टाळ ठोकून कारवाई केली. मात्र शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शाळा प्रशासनाने टाळ तोडून पुन्हा शाळा सुरू केल्याचे समोर आले आहे. परवानगीशिवाय शिक्षणसंस्था चालवत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही केला आहे.

शाळा व्यवस्थापन मनमानी पद्धतीने वागत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ केला जात असल्याची टीका मनसेने केली. याप्रकरणी शाळा प्रशासनावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जाहीर मागणी मनसेने केली आहे. शिक्षण विभागाने केलेली कारवाई धुडकावून शाळा बिनधास्तपणे सुरू ठेवली जात असल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने पुढील कारवाई काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT