Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Actor Fraud Case: हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप क्रेडिट कार्ड फसवणुकीचा बळी ठरला. जवळपास ७ कोटी रुपयांचा घोटाळा दोन वर्षे सुरू होता. हंगेरीत संशयिताला अटक करण्यात आली आहे.
Superstar Scammed
Superstar ScammedSaam tv
Published On

Actor Fraud Case: हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे, तर एका मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे तो चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉनी डेपला क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या प्रकरणात तब्बल ६ लाख ९० हजार डॉलर्सपेक्षा अधिक म्हणजेच भारतीय रुपयांनुसार सुमारे ७ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

माहितीनुसार, ही फसवणूक २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरू होती. या काळात डेपच्या अमेरिकन एक्सप्रेस कार्डचा वापर करून अनेक व्यवहार करण्यात आले. हॉटेल बुकिंग, ऑनलाइन शॉपिंग तसेच विविध डिजिटल सेवांसाठी करण्यात आलेल्या लहान-लहान ट्रांजेक्शनद्वारे ही रक्कम हळूहळू काढण्यात आली. विशेष म्हणजे, हे ट्रांजेक्शन इतक्या हुशारीने करण्यात आले की जवळपास दोन वर्षे कोणालाही त्याची माहिती मिळाली नाही.

Superstar Scammed
Riteish-Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक घोडदौड सुरुच; २८ व्या दिवशी केली दमदार कमाई

या प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा अमेरिकेतील एका बँकेला डेपच्या खात्यात काही संशयास्पद ट्रांजेक्शन आढळून आले. बँकेने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर ही बाब बुडापेस्टमधील FBI कार्यालयापर्यंत पोहोचली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास सुरू करण्यात आला.

Superstar Scammed
Famous Poet Death: उर्दू शायरीच्या सुवर्ण युगाचा अंत, प्रसिद्ध शायर काळाच्या पडद्याआड, साहित्यविश्वात शोककळा

तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी संशयास्पद ट्रांजेक्शनचा तपास केला असता, त्यांचे धागेदोरे हंगेरीची राजधानी Budapest येथील अंग्यालफोल्ड परिसरातील एका भाड्याच्या अपार्टमेंटपर्यंत पोहोचले. अनेक आठवड्यांच्या तपासानंतर ६ मे रोजी हंगेरियन पोलिसांनी २७ वर्षीय संशयिताला अटक केली. या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये सशस्त्र पोलीस संशयिताला ताब्यात घेताना दिसत आहेत.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपीने मोठी रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी छोट्या-छोट्या ट्रांजेक्शन करण्याचे ठरवले. त्यामुळे ही फसवणूक जास्त काळापर्यंत लक्षात आली नाही. सध्या पोलिसांकडून संशयिताला जॉनी डेपच्या कार्डची माहिती कशी मिळाली, याचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com