Riteish-Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक घोडदौड सुरुच; २८ व्या दिवशी केली दमदार कमाई

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. २८ व्या दिवशीही चित्रपटाने उत्तम कमाई करत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
Raja Shivaji Box Office Collection Day 28
Riteish - Raja Shivaji Collection day 28SAAM TV
Published On

Riteish-Raja Shivaji Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या महिन्यातही बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल २८ दिवस उलटूनही त्याच्या कमाईचा वेग मंदावलेला दिसत नाही. उलट प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ‘राजा शिवाजी’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढवतच आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या २८ व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ‘राजा शिवाजी’ने ४० लाखांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण होऊनही चांगली कमाई होत आहे. विशेष म्हणजे, चौथ्या बुधवारच्या तुलनेत गुरुवारी चित्रपटाच्या कमाईत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.

Raja Shivaji Box Office Collection Day 28
The Maharashtra Files: 'द महाराष्ट्र फाईल्स' वादात, सेन्सॉर बोर्डाकडून कात्री; रिलीजच्या १ दिवसाआधी प्रदर्शनाची तारीख बदलली

राजा शिवाजी’ने आता देशभरात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नेट कमाई केली आहे. या कामाईमुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी हा मान ‘सैराट’ या चित्रपटाकडे होता. आता ‘सैराट’नंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून ‘राजा शिवाजी’ची नोंद झाली आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 28
Pankaj Bhadouria: प्रसिद्ध सेलिब्रिटी मास्टरशेफला ब्रेस्ट कॅन्सर; स्वत: पोस्ट करत दिली माहिती, मनोरंजनसृष्टीत खळबळ

या चित्रपटाच्या यशामागे त्याची भव्य निर्मिती, दमदार कथा आणि तगडी स्टारकास्ट हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. रितेश देशमुखसोबत संजय दत्त, जेनेलिया डिसूझा, भाग्यश्री, फरदीन खान, अभिषेक बच्चन आणि सलमान खान यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com