My Mother Will Never Return…” – Heartbreaking cry of a child after her mother’s death in a Latur hit-and-run accident. Saam Tv
Video

"माझी आई आता दिसणार नाही..." – चिमुकलीची आर्त हाक, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

My Mother Will Never Return: लातूर औसा बायपासवर झालेल्या अपघातात आईचा मृत्यू, दोन चिमुकले आईविना झाले. आरोपी डॉक्टर दारूच्या नशेत गाडी चालवत होता, कठोर कारवाईची मागणी कुटुंबांकडून केली जात आहे.

Omkar Sonawane

लातूर औसा बायपासवर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू

आरोपी डॉक्टर दारूच्या नशेत गाडी चालवत होता

दोन चिमुकले आईविना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कुटुंबाची प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूर : औसा बायपास मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारने रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या संगिता गणथोडे (वय 34) यांना जोरदार धडक दिली होती. हा अपघात कार चालक मध्यधुंद अवस्थेत असताना झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या या अपघातानंतर संगिताबाईंच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे. आईच्या मृत्यूमुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमुकलीने रडत रडत व्यक्त केलेली वेदना "माझी आई आता दिसणार नाही..." हृदय पिळवटून टाकणारी होती.

या प्रकरणी आरोपी कारचालक डॉ. महेश पाटील याने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. नातेवाईकांनी त्याच्यावर 'हिट अँड रन' प्रकरण नोंदवण्याची मागणी केली आहे. मृत महिलेच्या पतीने आरोप केला आहे की, आरोपी डॉक्टर पैसे व प्रभावाच्या बळावर अटक टाळत असून कुटुंबाला धमक्या देत आहे. या अपघातामुळे दोन निरागस मुलांनी आपली आई गमावली आहे. गंथोडे कुटुंबाने प्रशासन व पोलिसांकडे न्याय मिळवून द्यावा, तसेच आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदिवलीत उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारनं अचानक घेतला पेट

Vajrai Waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा वजराई धबधबा, पावसाळ्यात साताऱ्याच्या सौंदर्यात भर

varaha jayanti : मुंबईत वराह जयंती साजरी, नितेश राणेंकडून आरती, VIDEO

Pregnancy During Periods: मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते का?

लक्ष्मण हाके यांच्या कारवर दगडफेक; बीडमध्ये हाके-पंडित कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा |VIDEO

SCROLL FOR NEXT