Jalgaon : आई- वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने मनात राग; तरुणाने संपविले जीवन

Jalgaon News : ऋषिकेश हा देखील मोलमजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ऋषीकेशने गेल्या काही दिवसांपासून मोबाईल घेऊन द्या म्हणून हट्ट धरला मात्र मोबाईल घेण्यासाठी पैसे नसल्याने आई- वडिलांनी नकार दिला
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : मुलांना मोबाईलचे वेड लागलेले आहे. अगदी लहान वयातच मुलांचा आई- वडिलांकडे मोबाईलसाठी हट्ट केला जात असतो. मात्र पालकांनी नकार दिल्यास यातून मुले टोकाचे पाऊल उचलत असतात. अशीच घटना जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथे समोर आली असून पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याच्या रागातून मुलाने आयुष्य संपविले आहे. 

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील (ता. जळगाव) येथील ऋषिकेश विजय न्हावी (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश हा आई- वडील, बहिणी यांच्यासह वास्तव्यास होता. ऋषिकेशचे वडील विजय न्हावी शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. तर ऋषिकेश हा देखील मिळेल ते मोलमजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ऋषीकेशने गेल्या काही दिवसांपासून नवीन मोबाईल घेऊन द्या म्हणून हट्ट धरला होता. 

Jalgaon News
Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

घराच्या गच्चीवर जात घेतला गळफास 

मोबाईल घेण्यासाठी पाहिजे तेवढे पैसे नसल्याने आई- वडिलांनी त्याची समजूत काढत नकार दिला होता. मात्र मोबाईल मिळणार नसल्याचा राग आल्याने ऋषिकेश शुक्रवारी कुणाशी काहीएक न बोलता घराच्या गच्चीवर निघून गेला. यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा खाली न आल्याने काही वेळाने त्याची आई गच्चीवर गेल्या यानंतर ऋषिकेश हा गळफास घेतल्याचे अवस्थेत आढळून आला. 

Jalgaon News
Taloda News : मृत्यूनंतरही यातना संपेना; पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ

आईचा प्रचंड आक्रोश 

दरम्यान मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला. आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर स्थानिकांनी त्यास तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी ऋषिकेश यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मुलाच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com