CCTV footage of the brutal land dispute attack in Sambhaji Colony, Sambhajinagar Saam Tv
Video

छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या वादातून रक्तरंजित हल्ला; गुंडांच्या हल्ल्यात तरुण ठार, पाहा VIDEO

Shocking CCTV Footage: छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत एका गुंडाने कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला असून वडील व मुलगा गंभीर जखमी आहेत. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजी कॉलनीत दुसऱ्याच्या जागेवर कब्जा मारून दादागिरी करणाऱ्या एका राजकीय पक्षाशी संबंधित गुंडाने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला. यात प्रमोद रमेश पाडसवान यांचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला, तर त्यांचे वडील रमेश पाडसवान आणि मुलगा रुद्राक्ष हे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी १ वाजता घडलेल्या खुनाचा थरार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी खून करणाऱ्या गुंडवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ काशिनाथ निमोने, ज्ञानेश्वर काशिनाथ निमोने, गौरव काशिनाथ निमोने, वडील काशिनाथ निमोने, आई शशिकला आणि जावई मनोज दानवे अशी हल्लेखोरांची नावे आहेत. यातील सौरभ, काशीनाथ, मनोजला पोलिसांनी अटक केली आहे. संभाजी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या पाडसवान कुटुंबाचे किराणा दुकान आहे. ज्ञानेश्वरने ३ वर्षापासून पाडसवान यांच्या घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर गणपती बसवणे सुरू केले. २ वर्षापूर्वी पाडसवान कुटुंबाने दुकानासाठी हा प्लॉट विकत घेतला. या जमिनीवरुन निमोने सतत पाडसवान यांच्याशी वाद घालायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

SCROLL FOR NEXT