Ladki Bahin Yojana Update  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: धक्कादायक! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी परराज्यातील महिला, मोठं रॅकेट उघड

Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट असल्याची माहिती उघड झाली आहे. उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिलांनी लाभ घेतला.

Priya More

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे या योजनेमध्ये बोगस लाभार्थीचे रॅकेट समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट असल्याची माहिती उघड झाली आहे.

लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे तब्बल ११७१ अर्ज दाखल केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे बोगस लाभार्थी महाराष्ट्रातील नाही तर उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील आहेत. या बोगस लाभार्थींनी ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी असल्याचे दाखवले आहे.

कागदपत्र अस्पष्ट, आधार क्रमांकाद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. दोन लॉगइनवरून ११७१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी २२ अर्ज हे बार्शी तालुक्यातील आहेत. या बोगस लाभार्थीचे लाभ थांबवण्यात आले आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT