Grapes Export : सांगली जिल्ह्यातून यंदा वीस हजार टन द्राक्ष निर्यात; मागील दोन वर्षापेक्षा निर्यातीत वाढ

Sangli News : नाशिक जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जात असते. निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन शेतकरी घेत असतात
Grapes Export
Grapes ExportSaam tv
Published On

सांगली : यंदा प्रतिकूल परिस्थितीत देखील सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यातीची संधी आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील दरासह निर्यातीची दरातही तेजी आहे. यंदा द्राक्ष गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक निर्यात होणार आहे. सर्वाधिक म्हणजे २० हजार टनापेक्षा  अधिक द्राक्ष निर्यात शक्य आहे. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

नाशिक जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. इतकेच नाही तर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जात असते. निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण व वातावरणात होत असलेल्या बदलामुळे द्राक्ष बागांवर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत होते. यामुळे उत्पादनात देखील घट निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु सध्या चांगले उत्पादन येणार असल्याचा अंदाज आहे. 

Grapes Export
Electric Bus : वर्ध्यात लवकरच धावणार ५३ इलेक्ट्रिक बसेस; फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळणार बस

आतापर्यंत ९९६ टन द्राक्ष निर्यात 

गेल्या दोन- तीन दिवसात उन्हाचा खडका वाढत असून द्राक्षाची गोडी वाढत आहे. त्यामुळे युरोपीय देशातील निर्यात आता दोन दिवसापासून सुरू झालेली आहे. आखाती देशात डिसेंबर पासूनच निर्यात सुरू झालेली आहे. आजपर्यंत ६५ कंटेनर मधून ९९६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. येत्या एप्रिल ते मी अखेर जिल्ह्यातून २० हजार टनावर निर्यातीचे उद्दिष्ट असून यंदा त्याहूनही अधिक निर्यात शक्य आहे.  

Grapes Export
Cyber Police : सायबर गुन्हेगारीतील मुख्य सूत्रधाराशी पाचजण ताब्यात; पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कारवाई

२०० कोटींची उलाढाल शक्य 

सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील दहा हजार ९५६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. यांच्या माध्यमातून २० हजार टन द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता असून यामधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटीहून अधिक रक्कम मिळणार आहे. नाशिक नंतर सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com