Kurla BEST Bus Accident SaamTv
Video

Kurla BEST Bus Accident : अनुभव नसताना बस चालवली? नेमणूक करणाऱ्यांची चौकशी होणार

Bus Accident Update News : कुर्ला येथील काल झालेल्या बेस्ट बस अपघातातील चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नसताना त्याची नेमणूक कशी करण्यात आली याबद्दल पोलीसांकडून आता चौकशी करण्यात येणार आहे.

Saam Tv

कुर्ल्यात काल रात्री झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघाताबद्दल आता नवीन माहीत समोर आली आहे. या बसच्या चालकाबाबत ही मोठी माहिती पुढे आली आहे. अपघात झालेल्या बसचा चालक संजय मोरे हा १ डिसेंबर रोजीच कामावर बस चालक म्हणून रुजू झाला होता. मोरे हा कंत्राटदाराचा चालक असून कंत्राटी पद्धतीने त्याची भरती झाली होती. या आधी तो खासगी बसवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे कोणताही अनुभव नसताना त्याची नेमणूक कशी झाली आणि एवढी मोठी इलेक्ट्रिक बस त्याला चालवण्यासाठी कशी देण्यात आली? याबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहे. कोणताही अनुभव नसताना मोरेला थेट इलेक्ट्रिक बेस्ट बस चालवायला देणाऱ्यांची देखील आता चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोमवारी रात्री कुर्ला परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ लोकं जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होत आहेत. या बेस्ट बसचा चालक संजय मोरे याला मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. तसंच सोमवारी त्याने प्रथमच ही बस चालवली, असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं. ५४ वर्षीय संजय मोरे हा १ डिसेंबरलाच चालक म्हणून रुजू झाला होता. यापूर्वी तो खासगी बसवर चालक म्हणून काम करत होता. मोठं वाहन चालवण्याचा त्याला अनुभव नव्हता अशीही माहिती समोर आली आहे. कोणताही अनुभव नसताना मोरेला थेट इलेक्ट्रिक बेस्ट बस चालवायला कशी दिली गेली? याबद्दल आता चौकशी होणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

SCROLL FOR NEXT