karuna munde sharma  Saam Tv
Video

Karuna Munde: आमचे जॉइंट अकाउंट, 1 कोटींची पॉलिसी मीच वारसदार; करुणा मुंडे यांचा खुलासा, VIDEO

Dhananjay Munde Case: करुणा मुंडे यांनी आज साम टीव्हीला विशेष मुलाखत दिली, यावेळी त्यांनी अनेक नवनवीन खुलासे केले.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे यांचा न्यायालयीन वाद आज पुन्हा एकदा चर्चेत आला. त्याच कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे लग्न अधिकृत नाही असा युक्तिवाद केला त्यामुळे एकच खळबळ उडाली. यासर्व प्रकरणावर करुणा मुंडेंनी आज साम टीव्ही च्या ब्लॅक अँड व्हाईटला दिलेल्या मुलाखतीत आज त्यांनी याबाबत पुरावे दिले.

त्या म्हणाल्या, हिंदू परंपरेनुसार देवाला अग्निसाक्ष ठेवून आपण लग्न करत असतो आणि जसं त्यांनी माझ्यासोबत लग्न केले आहे. तसंच त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बायको सोबत देखील केलं आहे. तिच्याकडे काहीही लीगल डॉक्युमेंट नाही पण माझ्याकडे अनेक लीगल डॉक्युमेंट आहे. आमचे दोघांचे बॅंकेत जॉईंट अकाउंट आहे.

माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मदाखल्यावर धनंजय मुंडे यांचे पिता म्हणून नाव आहे. पासपोर्ट आणि एफिडेबिट या सर्व कागदपत्रांवर आधार कार्ड आणि पॅन कार्डवर देखील धनंजय मुंडे यांचे नाव आहे. ही सर्व माहिती करुणा मुंडे यांनी साम टीव्हीसोबत बोलताना दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आमच्या दोघांचे एचडीएफसी बँकेत जॉइंट अकाउंट देखील आहेत. पॉलिसी आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी पॉलिसी काढली आहे. त्यावर मी बायको म्हणून नॉमिनी आहे असा खुलासा करुणा मुंडे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

IPL Success Story: बापाची जिद्द, पोराची मेहनत, कर्ज काढून क्रिकेट खेळायला पाठवलं, शहापूरचा लेक IPLमध्ये खेळणार

Pune : मोठी बातमी! भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, आयोगाची मोठी कारवाई

रात्रीच्या अंधारातही मांजरीला शिकार कशी दिसते?

SCROLL FOR NEXT