Dog Bite Saam TV
Video

Uttar Pradesh : कुत्रा चावल्यामुळे मृत्यू, राज्यस्तरीय कब्बड्डीपटूने गमावला जीव | VIDEO

State-Level Kabaddi Player Dies After Dog Bite in Bulandshahr : कुत्रा चावल्यानंतर केलेल्या निष्काळजीपणामुळे एका कब्बडीपटूच्या जीवावर बेतला आहे. राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ब्रजेश सोलंकी असं कबड्डीपटूचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्रजेश सोलंकी या राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ब्रजेश सोलंकीला महिनाभरापूर्वी कुत्र्याचं एक पिल्लू चावलं होतं. मात्र कुत्रा चावल्यानंतर देखील त्याने अँटी रेबीज इंजेक्शन घेतलं नाही. या निष्काळजीपणामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू बिघाड झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्रजेशचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात त्याची तब्येत ढासाळलेली स्पष्टपणे दिसत आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी वेळोवेळी कुत्रा चावल्यास तातडीने अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याचं महत्व सांगितलं आहे. मात्र, अजूनही अनेकजण या गंभीर आजाराबाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT