Nashik Saam TV
Video

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Godavari River : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण अर्धे भरले आहे. नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठवाड्याच्या जलजीवनाचा आधार असलेलं जायकवाडी धरण सध्या अर्धवट भरलं असून पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी थेट जायकवाडी धरणात येत असून त्यामुळे धरणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

कालपासून धरणात पाण्याची आवक आणखी वाढली असून केवळ २४ तासांत पाणीसाठ्यात सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या धरणाचा एकूण पाणीसाठा ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.

सध्या जायकवाडी धरणात तब्बल २४,१९२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आगामी काही दिवसांत नाशिक आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण आणखी भरून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT