Villagers in Kusumba and Lohara attack two alleged sadhus over child-lifting suspicions; vehicle vandalized, police investigation underway. Saam Tv
Video

Jalgaon News: जळगावमध्ये दोन साधूंना बेदम मारहाण; चारचाकी वाहनाचीही तोडफोड, कारण काय? VIDEO

Mob Justice in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा परिसरात साधूच्या वेशात आलेल्या दोन व्यक्तींना मुलं पळवण्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्यांची गाडीही फोडण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं पळवण्याच्या संशयावरून साधूंच्या वेशात आलेल्या दोघा व्यक्तींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.

हरियाणातून आलेले हे साधू जडाबुटी विक्री करत असल्याचं सांगत होते. मात्र, मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर मुलं पळवण्याचा संशय घेतला. संतप्त ग्रामस्थांनी त्यांना रस्त्यावर पकडून मारहाण केली आणि त्यांच्या चारचाकी वाहनाचीही जोरदार तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या दोघांनी खरोखरच गैरकृत्य केलं होतं की अफवेमुळे ही घटना घडली, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT