Iran Israel War Saam TV
Video

Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे आता पेट्रोल महागणार|VIDEO

Iran Israel War : इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये मोठं नुकसान झाले आहे. जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली असून पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इराण-इस्रायल संघर्ष चिघळला असून आता तो युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इराणनं इस्रायलच्या राजधानीसह महत्त्वाच्या शहरांवर एकाच वेळी १०० पेक्षा अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. याआधी शुक्रवारी दुपारी इराणने १०० हून अधिक सुसज्ज ड्रोन्सनी हल्ला केला होता. इस्रायलनं इराणच्या अणुसंयंत्र केंद्रांवर कारवाई केल्यानंतर इराणने हा प्रतिहल्ला केला. काल रात्रीदेखील इराणकडून सतत क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, ज्यामुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठं नुकसान झालं असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली असून पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराण-इस्रायलच्या अनेक अणुस्थळांवर हल्ला केला त्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याचा भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम झाला असून शेर्अस कोसळले आहेत. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात त्यांचे पैसे काढून घेतं आहेत. त्याचा थेट परिणाम पुन्हा एकदा सोनं आणि डॉलरमध्ये जलद गुंतवणुकीच्या स्वरूपात होऊ शकतो. तर भारतात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होऊ शकते अस झालं तर थेट परिणाम मालवाहतुकीवर होईल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कडाडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारतीय कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT