Dhanshri Shintre
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत असून, अनेक कंपन्या नवीन ई-कार मॉडेल सादर करण्यावर भर देत आहेत.
जपानमधील प्रसिद्ध कार कंपनी होंडाने त्यांच्या सर्वात लहान इलेक्ट्रिक कार ‘N-One e’ अधिकृतपणे जपानी बाजारात लाँच केली आहे.
गुडवुड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये या कारचे प्रोटोटाइप सादर करण्यात आले होते, जिथे तिच्या बॉक्सी आणि रेट्रो डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधले होते.
सप्टेंबरपासून ही रेट्रो लुक असलेली आधुनिक इलेक्ट्रिक कार जपानी रस्त्यांवर धावणार आहे. पाहूया, तिची खास वैशिष्ट्यं काय आहेत.
३,४०० मिमी लांबीची ही कार मारुती अल्टो K10 पेक्षाही लहान असून, त्यात अनेक आधुनिक आणि प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत.
या रेट्रो शैलीतील कारच्या फ्रंटमध्ये गोल एलईडी हेडलॅम्प आहेत, ज्यात गोलाकार एलईडी डीआरएल्सचाही आकर्षक समावेश करण्यात आला आहे.
या इलेक्ट्रिक मायक्रोकारला सरळ फ्रंट डिझाइन, क्लॅमशेल प्रकारचा बोनट आणि उजवीकडे चार्जिंग व व्हेईकल-टू-लोड (V2L) पोर्ट देण्यात आले आहेत.
साइड प्रोफाइलमध्ये बॉडी रंगाचे डोअर हँडल्स, टर्न सिग्नल असलेले ड्युअल-टोन ORVM, ब्लॅक-आउट B पिलर आणि गोल व्हील दिसतात.
N-One e मध्ये कंपनीने 6-स्पोक लहान चाके दिली असून, मागे रुंद विंडस्क्रीन आणि उभे आयताकृती टेल लॅम्प्स दिले गेले आहेत.
ही कार पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, चीअरफुल ग्रीन, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, लूनर सिल्व्हर मेटॅलिक, झोर्ड मिस्ट पर्ल आणि सीबेड ब्लू पर्ल.