China on Arunachal Pradesh saam tv
Video

Arunachal Pradesh : हमारा है, था और रहेगा! खोड्या काढणाऱ्या चीनचं भारतानं नाकच ठेचलं, VIDEO

Arunachal Pradesh places rename : भारत-पाकिस्तान तणाव वाढलेला असतानाच चीननं खोडी काढली आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारतानं चीनची खोड मोडली आहे.

Nandkumar Joshi

कुरापतखोर चीननं पुन्हा खोडी काढली आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानं सडेतोड उत्तर देत चीनची खोड मोडली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी या मुद्द्यावर बुधवारी भूमिका मांडली. चीनच्या या अशा प्रयत्नांमुळं निर्विवाद सत्य काही बदलणार नाही. हे राज्य देशाचा अविभाज्य भाग आहे, तो होता आणि राहील, असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत.

अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावं चीनकडून जाहीर केल्यानंतर भारतानं कठोर शब्दांत टीका केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचे निरर्थक प्रयत्न केले आहेत. नावं बदलल्याने निर्विवाद वास्तव बदलणार नाही, असेही जयस्वाल यांनी सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT