Income Tax Slab 2025 SAAM TV
Video

Budget 2025 : करदात्यांसाठी मोठी खूशखबर? 10 लाखांपर्यंत टॅक्स नाही? वाचा स्पेशल रिपोर्ट

income tax slab news : टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी.. कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. नेमका हा निर्णय काय आहे पाहूया..

Snehil Shivaji

केंद्र सरकार कोट्यवधी करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी रोजी जाहिर होणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधल्या पहिल्या अर्थसंकल्पात कोट्यवधी करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करुन नोकरदारांना खूश करण्याची शक्यता आहे.

सध्या टॅक्सस्लॅब कसा आहे त्यावर एक नजर टाकूया..

पगार नवीन करप्रणाली

0-3 लाख 0%

3-7 लाख 5%

7-10 लाख 10%

10-12 लाख 15%

12-15 लाख 20%

15लाख+ 30%

जर 10 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त झालं तर कोणाला फायदा होईल ते देखील पाहूया..

मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात

करकपात झाल्यास मध्यमवर्गाला मोठा दिलासा

करकपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार

नोकरदारांच्या हाती अधिक पैसा येईल

ग्राहक खर्च वाढून अंतिमत: अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत

देशात साडेसात कोटी करदाते असून त्यापैकी ७० टक्के लोक हे करमुक्त श्रेणीत येतात. पगारातून थेट टॅक्स कापला जात असल्यानं टॅक्सचा सर्वाधिक बोजा हा नोकरदार वर्गावर पडतो त्यामुळे जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर त्याचा मोठा लाभ नोकरदारांना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT