MumbraVoterIDScam Saam Tv
Video

मुंब्र्यात कचऱ्यात सापडले शेकडो मतदान कार्ड; निवडणूक प्रक्रियेवर 'ढीगभर' प्रश्न | VIDEO

Hundreds Of Voter ID Cards Found In Mumbra Garbage: मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरात कचऱ्यात शेकडो मतदान कार्ड सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही कार्ड कळवा विभागातील असल्याचे समोर आले असून बोगस मतदान झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Omkar Sonawane

मुंब्रा रेतीबंदर गणेश घाट परिसरात कचऱ्यात शेकडो मतदान कार्ड सापडले.

ही सर्व मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचे उघड झाले.

काँग्रेसचे वसीम सय्यद यांनी बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला.

या प्रकरणामुळे निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा संशय आणि टीका होत आहे

मुंब्रा रेतीबंदर गणेश घाट परिसरात कचऱ्यात शेकडो मतदान कार्ड सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचे समोर आले असून यामुळे निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणावर काँग्रेसचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष वसीम सय्यद यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या मतदान कार्डांच्या मदतीने विधानसभा मतदारसंघ क्रमांक 72 मध्ये बोगस मतदान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशभरात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आधीच निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना मुंब्र्यातील या घटनेमुळे आणखीनच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT