Shruti Vilas Kadam
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर जेल किंवा फोमिंग फेसवॉश वापरा. हे अतिरिक्त तेल, घाण आणि धूळ काढून टाकण्यास मदत करतात आणि मुरुमांचा धोका कमी करतात.
कोरड्या त्वचेसाठी क्रीम-बेस्ड किंवा हायड्रेटिंग फेसवॉश उत्तम ठरतो. ग्लिसरीन, हायलुरॉनिक अॅसिड किंवा सेरामाइड्स असलेले फेसवॉश त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात.
टी-झोन तेलकट आणि गाल कोरडे असतील, तर सौम्य व pH-बॅलन्स्ड फेसवॉश वापरा. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडत नाही.
अॅलर्जी किंवा त्वचेची जळजळ होत असल्यास अल्कोहोल, कृत्रिम सुगंध आणि कठोर रसायने नसलेला फेसवॉश वापरणे अधिक सुरक्षित ठरते.
टी ट्री ऑईल, सॅलिसिलिक अॅसिड, व्हिटॅमिन C, अॅलोवेरा किंवा नियासिनामाइड यांसारखे घटक त्वचेच्या गरजेनुसार फायदेशीर ठरू शकतात.
सकाळी आणि रात्री फेसवॉश वापरणे पुरेसे असते. वारंवार चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन कोरडेपणा वाढू शकतो.
इतरांना सूट होणारा फेसवॉश तुम्हालाही योग्य असेलच असे नाही. नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि त्वचेनुसार योग्य पर्याय निवडा.