Surabhi Jayashree Jagdish
शिळा भात पुन्हा गरम करून खाणं पूर्णपणे चुकीचं नाही. मात्र, तो कसा साठवला गेला आणि कसा गरम केला जातो यावर त्याची सुरक्षितता अवलंबून असते. योग्य पद्धतीने साठवलेला आणि नीट गरम केलेला भात खाणं सुरक्षित मानलं जातं.
शिजवलेला भात बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवला तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. हे बॅक्टेरिया काही वेळा अन्नातून विषारी घटक तयार करू शकतात. त्यामुळे असा भात खाल्ल्यास पोटदुखी, जुलाब किंवा फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.
भात शिजल्यानंतर तो शक्य तितक्या लवकर थंड होऊ द्यावा. त्यानंतर स्वच्छ आणि बंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावा. योग्य साठवण केल्यास भाताची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकून राहण्यास मदत होते.
भात खाण्यापूर्वी तो पूर्णपणे गरम होईल याची खात्री करावी. मध्ये थंड राहिलेला भात खाणं टाळावं. एकसमान तापमानाने गरम केल्यास बॅक्टेरियाचा धोका कमी होण्यास मदत होते.
एकाच भाताला पुन्हा पुन्हा गरम करणं योग्य नाही. प्रत्येक वेळी गरम आणि थंड करण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नाची क्विलिटी कमी होऊ शकते. त्यामुळे जितका भात खायचा आहे तितकाच भाग गरम करणं अधिक सुरक्षित मानलं जात.
भातातून विचित्र किंवा आंबट वास येत असेल तर तो खाऊ नये. भाताचा रंग बदललेला किंवा पोत असामान्य वाटत असेल तरी तो टाकून द्यावा. अशा भाताचं सेवन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
शिळा भात खाण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि वास तपासणं आवश्यक आहे. योग्य साठवण, योग्य तापमानावर गरम करणं आणि वारंवार गरम करणं टाळणं या सवयी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.