VIDEO: Worli मध्ये भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू Saam TV
Video

VIDEO: Worli मध्ये भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, अपघातग्रस्त BMW कार पोलीसांच्या ताब्यात

Mumbai Worli Accident News: मुंबईतील वरळीत भरधाव वेगात आलिशान कारने दिली धडक, अपघातानंतर सात दिवसाने एका तरुणाचा मृत्यू.

Uday Satam

मुंबईतील वरळीत भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दिलेल्या धडकेत एका २८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर सात दिवसांनी या व्यक्तीचा मृत्यू झाला असून विनोद लाड असे मृत तरुणाचे नाव आह. पोलिसांनी चालक किरण इंदुलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 20 जुलै रोजी वरळी सी लिंकजवळ अब्दुल गफ्फार खान रोडवर लाड यांना भरधाव BMW कारने धडक दिली होती. शनिवारी 27 जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वरळी येथे अशाच प्रकारची हिट-अँड-रनची घटना घडली होती यात 45 वर्षीय कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता वरळीतून आणखी एक अपघात झाला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाल्याची बातमी समोर येत आहे. अपघातग्रस्त BMW कार पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच याच पोलीस ठाण्यात वरळीमधील हिट-अँड-रन प्रकरणात महिलेला धडक दिलेली BMW कार देखील इथे असल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT