Hingoli News Saamtv
Video

Hingoli News : अबब! पालेभाज्यांसाठी महिला आठ तासांपासून रांगेत, काय आहे कारण? पाहा Video

Sarang Swami Yatra : महाराष्ट्राला संत महात्मे यात्रा आणि उत्सवाची परंपरा आहे. अशाच एका यात्रेत सध्या महिला भाविक चक्क आठ तास रांगेत उभ्या असल्याचं बघायला मिळत आहे. ही रांग पालेभाज्यांसाठी लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Saam Tv

महाराष्ट्राला संत महात्मे यात्रा आणि उत्सवाची परंपरा नेहमीच राहिली आहे, गाव तालुका आणि जिल्हा बदलला की यात्रा आणि उत्सवात वेगळीकता असते. हिंगोली जिल्ह्यात देखील एका यात्रेत भाविकांना वाटप करण्यात येणाऱ्या महाप्रसादाची चर्चा आहे आणि हा महाप्रसाद मिळविण्यासाठी भाविक चक्क आठ तास रांगेत उभे राहतात.

कुणाच्या हातात डब्बे, तर कुणाच्या हातात स्टील केटली, आणि हजारोंच्या संख्येने उभे असलेल्या महिलांची रांगा हे सगळं सुरू आहे देवाच्या दरबारात. शिजलेला महाप्रसाद मिळवण्यासाठी आणि हा साधासुधा महाप्रसाद नव्हे तर चक्क बारा प्रकारच्या पाले आणि फळभाज्या एकत्र करून मोठ्या लोखंडी कलईमध्ये शिजवलेली भाजी आहे.

या भाजीमहाप्रसादाचा इतिहास देखील मोठा रंजक आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी संत शिरोमणी सारंग स्वामी महाराजांनी हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील दारूकावन माळावर मंदिराची स्थापना करत इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद म्हणून जंगलातील कंदमुळे द्यायला सुरुवात केली होती. मात्र पुढे जंगलामध्ये मानवांचा हस्तक्षेप वाढला आणि रानमेवा नष्ट झाला. मात्र सारंग स्वामींची ही प्रथा परंपरा सुरू ठेवत या मंदिर व्यवस्थापनाने पुढे पाले आणि फळभाज्यांचा महाप्रसाद सुरू केला तो आज देखील सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून एकाला मारहाण

Chanakya Niti: तुम्हाला करोडपती व्हायचंय? मग या 7 फॉर्म्यूल्यांवर आजपासून करा काम सुरू

Shocking : मैत्रिणीनं केला घात, खोटं सांगून घरी नेलं अन् भावाच्या हवाली केलं; १० वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Forehead Pimples: कपाळावर पिपंल्स का येतात? ते कसे घालवायचे?

Professors Appointments: विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर, अशा प्रद्धतीने होईल निवड

SCROLL FOR NEXT