Hingloli Farmer Protest Saam Tv
Video

Hingoli: सरकारने दिलेली नुकसान भरपाई रक्कम तुटपुंजी, शेतकऱ्यांनी उधळले पैसे; पाहा VIDEO

Hingloli Farmer Protest: हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयाबाहेर आंदोलन केले. सरकारने अतिवृष्टीचे नुकसान म्हणून दिलेले पैसे उधळले. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

दोन आठवड्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले. हिंगोलीमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत देण्यात सुरूवात केली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई झाल्याची मदत खात्यावर मिळाली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या पुढे ही रक्कम फेकून दिली.

विशेष म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून हिंगोली आणि सेनगाव तालुका देखील वगळला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सरकारने नुकसान झालेल्या बळीराजाला हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT