Nanded News
Nanded NewsSaam tv

Nanded : विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळला; शेतकरी आक्रमक, गांजा लागवड परवानगीची केली मागणी

Nanded News : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने मदत जाहीर केली आहे. मात्र नांदेड जिल्हा यातून वगळण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले असून सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त करत आहेत
Published on

संजय सूर्यवंशी
नांदेड
: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून भरपाईची अपेक्षा आहे. दरम्यान राज्य शासनाने ३१ जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासन आदेश काढला आहे. शासनाने काढलेल्या या आदेशात नांदेड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आले असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. 

मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. तर राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. साडेसहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं आहे. असे असताना नांदेड जिल्ह्याला शासनाने मदत नाकारली. शासनाने नांदेड जिल्ह्याला वगळल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. 

Nanded News
Buldhana Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण; नाकाबंदी तोडत कार सुसाट, अपहरणकर्त्याच्या कारचा अपघात झाल्याने फसला डाव

गांजा लागवड परवानगीची मागणी 

नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाले असून सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून मदत मिळणार नाही. यामुळे जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हा हा पाकिस्तान मध्ये आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर शेतीत काही उरलं नाही त्यामुळे शासनाने शेतामध्ये गांजा लावण्याची परवानगी द्यावी; अशी देखील मागणी आता या शेतकऱ्याने केली आहे. 

Nanded News
Wada News : मोबदला न देताच विद्युत वाहिनी मनोरे उभारणी सुरु; शेतमालाचे नुकसान, शेतकऱ्यांचे आंदोलन

अमरावतीतील ६ तालुके वगळले 
शासनाने जाहीर केलेल्या पॅकेज मधून अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीत सहा तालुके वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. धामणगाव तहसील कार्यालयावर काँग्रेसचा शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात आला असून तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे. सरकारने केवळ तोंडाला पाने पुसले तसेच धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमिशन घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com