Himachal Pradesh Saam TV
Video

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

Mandi Monsoon Weather Update : मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. बियास नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हवामान विभागानं हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या पावसामुळे बियास नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. ड्रोन फुटेजद्वारे नदीच्या वाढलेल्या प्रवाहाची आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीरता स्पष्टपणे दिसून येत आहे. मंडीसह बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर, हमीरपूर, कांग्रा, कुल्लू, उना आणि चंबा या जिल्ह्यांमध्ये पुराचा तसेच भूस्खलनाचा संभाव्य धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT