Hemant Patil News SaamTv
Video

VIDEO : हेमंत पाटील-प्रताप पाटील चिखलीकर मनोमिलनाचा महायुतीला फायदा?

Hemant Patil - Pratap Patil Chikhalikar News : आमदार हेमंत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मनोमिलन झाले आहे. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saam Tv

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार हेमंत पाटील यांचे आज मनोमिलन झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या मनोमिलनाने महायुतीला याचा फायदा होईल का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. या पराभवाला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेच जबाबदार होते. राजश्री पाटील यांच्या विरोधात मागच्या वेळेस माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उघडपणे प्रचार केला होता. तेंव्हापासून प्रताप पाटील आणि हेमंत पाटील यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. परंतु या निवडणुकीत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मैदानात आहेत. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन पाऊले मागे येत हेमंत पाटील यांच्या सोबतचे वितुष्ट मिठवण्याचा प्रयत्न केला. अखेर हेमंत पाटील आणि प्रताप पाटील यांच्या मध्ये एका प्रचार सभेत मनोमिलन झाले. जिल्ह्यातील या बड्या नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याने याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : महायुतीने घेतला कांद्याचा धसका! निर्यात शुल्कात पुन्हा कपात

Mayavati News : तर बसप सरकारमध्ये सामील; महासभेतून सुश्री मायावतींचे संकेत

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT