Dramatic visuals show the rescue of three individuals stranded in the flooded Yashoda River in Wardha district’s Deoli taluka.  saam tv
Video

Wardha Rain: वर्ध्यात पावसानं जनजीवन विस्कळीत, यशोदा नदीला पूर, ३ मुलांच्या सुटकेच्या थरारक व्हिडिओ व्हायरल

Flood Horror in Wardha: वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला असून, तीन नागरिकांना अडकले होते. त्यात एका शाळकरी मुलाचाही समावेश होता.

Omkar Sonawane

वर्धा जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे तिघेजण अडकले होते. सुदैवाने स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेमुळे तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली. अडकलेल्यांमध्ये एका शाळकरी मुलाचाही समावेश होता.

गुरुवारी सकाळी भावेश अमोल कापसे (वय १५, रा. डिगडोह), उमेश रामदास साखरकर (वय ३८, रा. नागझरी) आणि प्रज्वल पंडित सावरखेडे (वय ४०, रा. नागझरी) हे तिघे पुराच्या पाण्यात अडकले. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे यशोदा नदीसह परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.

या घटनेत एक दुचाकी व सायकल वाहून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि देवळी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तहसीलदार क्षीरसागर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नदी-नाल्यांना पूर आला असेल तर त्या ठिकाणी जाऊ नये, आपली आणि इतरांची सुरक्षा महत्वाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT