Mumbai Heat Wave Saam Tv
Video

Heat Wave: सावधान! मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, उन्हामुळे मृत्यू वाढणार

IMD Alert For Mumbai: मुंबईतील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशामध्ये हवामान खात्याकडून मुंबईमध्ये उष्णता आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईसह ९ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलाय.

Priya More

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये उन्हामुळे सर्वात जास्त बळी जाण्याची शक्यता आहे. खासकरून मुंबईकारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. मुंबईसह ९ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाढते तापमान आणि आद्रतेमुळे हिट इंडेक्स प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे शरीरावर उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावध राहण्याचे आणि काळजी घेण्याची गरज आहे. कडक उन्हात घराबाहेर पडणं मुंबईकरांनी टाळावं असं सांगितले जात आहे.

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, सूरत, फरिदाबाद, ग्वोलेर, कोटा, लुधियाना आणि मेटरमध्ये उष्णता प्रचंड वाढण्याची शक्यता असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उष्णता वाढल्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होऊन आजारी पडून नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये वेळीच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT