Hanuman jayanti Saam TV Marathi
Video

बजरंगाची कमाल...अन् जेवणाच्या पंगतीत वानर सेनेची धम्माल

Hanuman Jayanti viral video : हनुमान जयंतीनिमित्त अकोल्यात माकडांची अनोखी पंगत पाहायला मिळाली. वानरसेनेने शिस्तीत बसून प्रसाद ग्रहण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

विनोद पाटील -

हनुमान जयंतीच्या निमित्ताने अकोल्यात एक अनोखी पंगत बसलीय... ती पण वानरसेनेची... माणसांच्या पंगतीला लाजवेल अशीच ही पंगत आहे...चला तर मग या पंगतीत जाऊ अन् प्रसाद ग्रहण करु....

...

देशात हनुमान जयंतीचा जोरात जल्लोष हाय... कुठं रंगल्यात कुस्त्याचं फड तर कुठं भाविक भजनात दंग...

पण अकोल्यात माकडांनी हाणलाय जेवणाच्या पंगतीवर ताव.... नुसता धिंगाणा उडवून देणारी माकड आज मात्र एकदम शिस्तीत बसली हुती.... शिवटी आपलं पूर्वजच की .... बघा की जरा ही हिडीओ...

अकोल्यातल्या कोथळी (बु) गावचा.. जंगलात असणाऱ्या मंदिरात हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मागच्या 20 वर्षापासून बसणारी ही पंगत हाय.... मंदिरातल्या पुजाऱ्यानं ताटांची मांडणी केली...

ताटत वानरांना आवडणारं चणं फुटाणं ठेवलं.... पगंतीला ताट बघताच डोंगरावर अन् झाडावर बसलेली माकड चटकण खाली उतरली... अन् पंगतीला बसली... ती बी एकमद शिस्तीत... नेहमी दंगा मस्ती करणारी माकडं आज एकदम देवगुणाची..

मंदिराचं महाराज बी त्यांना अग्रह करुन जेवू घालत होतं.निमित्त जरी हनुमान जयंतीचं असलं तरी मुक्या जनावरात देव पाहणं ही आपली संस्कृती...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT