Gulmarg Snowfall SAAM TV
Video

Gulmarg Snowfall : निसर्गाचा अद्भुत नजारा, गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी पर्यटनासाठी नंदनवन खुलले! | VIDEO

fresh snowfall in Gulmarg : ताज्या बर्फवृष्टीने गुलमर्ग पांढऱ्या शुभ्र चादरीखाली झाकलं गेलं आहे. या बर्फवृष्टीमुळे हिवाळी पर्यटन हंगामाची यशस्वी सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पर्यटनाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीमुळे परिसर पांढरा शुभ्र चादरीखाली झाकला गेला आहे. 'पर्यटकांसाठी एक अद्भुत दृश्य या ठिकाणी निर्माण झाले आहे.' ताज्या बर्फवृष्टीमुळे गुलमर्गचे सौंदर्य आणखीनच खुलले असून, निसर्गाचा हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं गुलमर्गकडे वळू लागली आहेत. थंडीची लाट तीव्र झाल्याने येथील बर्फाची चादर आणखी दाट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या हलक्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण परिसर पांढराशुभ्र झाला आहे, ज्यामुळे स्थानिक आणि पर्यटक दोघांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असली तरी, या बर्फवृष्टीमुळे हिवाळी पर्यटन हंगामाची यशस्वी सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नववर्ष स्वागतासाठी रायगडमध्ये जड आणि अवजड वाहनांवर तात्पुरती वाहतूक बंदी

Nashik: एबी फॉर्मची पळवापळवी, नाशिकमध्ये भाजपात राडा, ३ आमदारांच्या गाडींचा जिल्हाध्यक्षांकडून पाठलाग; पाहा VIDEO

Eye Makeup Tips: डोळे मोठे दिसत नाहीत? या ४ सोप्या टिप्स करा फॉलो, बारिक डोळे दिसतील टपोरे अन् रेखीव

Pranjal Dahiya Video: 'काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची...'; कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्याला गायिकेने सुनावली खडे-बोल

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT